मी, माझे अन फक्त मलाच बघतो
अतिरेक होता तो आरसा फुटतो
प्रतिबिंबाचे तुकडे हजार करतो
शब्दबंबाळ कवितेला विषय पुरवतो
कधी ठरवतो मी मग आतून
हुसकून लावीन सारे मीपण
मुहूर्त शोधतो उठतो लवकर
ध्येयाचा त्या ध्यास भयंकर
पण मीपण म्हणजे नक्की काय
कुणाला घालवायचं काही कळत नाय
शून्यात कधी मग मी जातो
अवघा शून्यची उरून बसतो
निराश मनाने विचार करतो
वळतो, पळतो अन पेटवतो
साला सुंभ जळला तरी पीळ उरतो
भाषेतून काढले जर मी, मला अन माझे
भावना काय व्यक्त कराव्या 'तुझ्या', 'त्याच्या' संबोधाने
त्यापेक्षा करीन म्हणतो या शब्दांचा वापर संयमाने
बघूया... किती जमतंय ते..
Friday, December 18, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
