बाबू माझं नाव
आहे पुणे माझं गाव
IT मध्ये राबतो
घेऊन देवाचं नाव
कामासाठी जन्म माझा
जन्मभर काम
कोडींग करून करून
माझी वाट लागली जाम
खुर्चीमध्ये असतो बसून
ऑफिस माझं छान
जेवायला असतो पिझ्झा
सारखं कॉफीचं स्नान
facebook, orkut यातलं काही
नसतं इथे block
दिवस गेला, समजत नाही
फिरत रहातं clock
boss कडे ती मर्सिडीज
नी माझी व्यागन - आर
असं कसं? म्हणुन
घेतो कार लोन फार
थ्री BHK घर
mainte-nance चार हजार
EMI सगळे भरून,
भरून मी बेजार
आधी वाटे भारी
achieve-ment च खरी
आता आयुष्यभर फक्त
लोन ची चाकरी
हॉटेल काढायचं स्वप्नं आता
स्वप्नंच बनून राहणार
संधी तशी येईतो
माझी मुलंच कर्ती होणार
सगळा खोटा भास
आहे सगळी खोटी शान
IT फिल्डची नोकरी
जशी खाटकापुढे मान
म्हणुन सांगतो ऐका
नी विचार करा थोडा
जाळं विणायच्या आधीच
ही मासेमारी सोडा
.......... ही मासेमारी सोडा
~ गांजलेला निखिल
[तळटीप: वरील सर्व मतांशी आणि कार्यकारणभावाशी(!) कवी सहमत असेलच असे नाही. :) ]
[तळटीप: वरील सर्व मतांशी आणि कार्यकारणभावाशी(!) कवी सहमत असेलच असे नाही. :) ]
