Monday, May 27, 2013

IPL ची शिसारी (विस्कळीत शब्दांत)

franchisees चे मालक
शेट्टी, अंबानी नी झिंटा,
"लुटू-पुटूचंच क्रिकेट हे
यात 'fixing' कुठलं घंटा?"

"entertainment 'तीन'दा
आहे जसा डर्टी 'पिक्चरा'त
लेकोहो फक्त एन्जॉय करा
नी भाकऱ्या भाजा लष्करात"

------------------------------------------------------

            क्रिकेटचा झालाय बाजार
            आणि बाजारात मांडलंय क्रिकेट
            खेळाडू तेव्हढे श्रीमंत
            नी इतर सगळ्यांची विकेट

        जिंकणार्यास मिळाले दहा
        दुसर्याला ही करोड सात
        माझे गेले अनेक तास
        मे महिन्याची वाताहात

            सचिन, द्रविड तुम्ही चांगलं
            'timing' पाहून सुटलात
            "चिखलात कमळ" खरंय
            तरी बरबटण्यातुन वाचलात

        उरलेत अनेक श्रीसंथ
        नी "अंकित" झालेले चंदिला
        येतात क्रिकेट खेळायला
        आणि बुद्धी घरीच खुंटीला

            द्रविड गेला सचिन गेला
            IPLच्या वाटे जाईल कोण?
            बाकीचे फक्त बॉल कोलतात
            बाजारबुणग्यांना पाहील कोण?

        सांगतोय आता स्वतःलाच
        की IPL बघणं सोडू
        मोठया TRP चा
        तो माज त्यांचा मोडू

        ~ (एक्स) क्रिकेटवेडा निखिल

3 comments:

aapla vaachak said...

jabaradastt !!
farach surekh lihalay sir

pawasacha chatak ..me "kavitecha vachak !!" said...

jaradast !!! ekdum marmeek !!
farach surekh sir..

Nikhil Manohar. said...

मीटर मध्ये बसवल्यानंतरची…. :)


franchisees चे मालक
शेट्टी, अंबानी नी झिंटा,
"लुटू-पुटूचंच क्रिकेट हे
यात 'fixing' कुठलं घंटा?"

"entertainment 'तीन'दा
जसा डर्टी 'पिक्चरा'त
लोकहो एन्जॉय करा
नी भाजा भाकऱ्या लष्करात"

------------------------------------------------------

क्रिकेटचा झालाय बाजार
बाजारात मांडलंय क्रिकेट
खेळाडू तेव्हढे श्रीमंत
इतर सगळ्यांची विकेट

जिंकणार्याला मिळती दहा
दुसर्याला ही करोड सात
माझे गेले अनेक तास
मे महिन्याची वाताहात

सचिन, द्रविड तुम्ही चांगलं
'timing' पाहून सुटलात
"चिखलात कमळ" खरंय
तरी बरबटण्यातुन वाचलात

उरलेत अनेक श्रीसंथ
नी "अंकित" झाले चंदिला
येतात क्रिकेट खेळायला
आणि बुद्धी घरीच खुंटीला

द्रविड गेला सचिन गेला
IPLच्या वाटे जाईल कोण?
बाकीचे फक्त कोलती बॉल
बाजारबुणग्यांना पाहील कोण?

सांगतोय आता स्वतःलाच
की IPL बघणं सोडू
मोठया TRP चा
तो माज त्यांचा मोडू