Friday, August 7, 2009

रोहित जोगळेकर याला मी लिहिलेले ओर्कुट टेस्टीमोनीअल...

या प्राण्याबद्धल काय लिहावे काही सुचत नाहीये... पण काहीतरी खरडीन म्हणतो...
१०-१२ वर्षे जो माणूस तुमचा सख्खा मित्र आहे त्याच्या बद्धल थोडे तरी लिहीता आलेच पाहिजे नाही का!?
काय... तुमचे काय मत आहे या बद्धल!? ;-)

असो... पहिली गोष्ट जी याला पाहिल्यावर लक्ष वेधून घेईल ती म्हणजे याचे अशक्य कोकणस्थी घारे डोळे
आणि सोनेरी केस!! (केस हल्ली थोडे दुर्मिळ झालेत पण आहेत अजूनही काही शिल्लक... )
[याच रंग, डोळे अन् केसांमुळे यास बगळ्या, गोऱ्या वगैरे (प्रेमळ!?) टोपण नावे पडली आहेत!]

ओळख झाल्यावर हळूहळू याच्या जिभेवरचा कोकणस्थी डंख सुद्धा लक्षात येईल... शेपटीवर पाय
ठेवण्याचा केवळ अविर्भाव जरी केलात तरी कडकडून डंख बसेल... तेव्हा जरा जपूनच असलेलं बरं...

काही थोडे बरे गुण सुद्धा आहेत तसे याच्यात... अगदीच नाही असं नाही...
उदाहरणार्थ, ...उम्म्म... काय बरं.... हां...
पुलंचा निस्सीम चाहता आहे हा... त्यांच्या कथाकथनातली वाक्ये लीलया फेकत असतो!
प्रचंड ट्रेकाड्या (म्हणजे ट्रेकाडपन्थी!) माणूस आहे!
आणि हो भलताच "गाता गळा" आहे.. विशेषतः 'सोनू निगमा' ची गाणी छान म्हणतो!
आणि हो... Mouth Organ झक्कास वाजवतो...

आरेच्या... "काही" बरे गुण म्हणता म्हणता बरेच 'गुण' लिहीले की मी इथे...
एका कोकणस्थाने दुसऱ्या कोकणस्थाची सलग चार ओळींपेक्षा जास्त स्तुती करणे 'allowed' नसते...
म्हणून आता थांबतो... :-)

एकंच सांगेन म्हणतो... स्वतःची काळजी स्वतः घेण्यास, तात्विक अन् कधी कधी अध्यात्मिक(!) चिडचीड सहन करण्यास समर्थ असाल तर एकदा रोहितला नक्कीच भेटा... Its worth taking risk! Really!! ;-)
कुठल्या तरी किल्ल्यावर किंवा बादशाही मध्ये किंवा पुणे बोर्डिंग हाउस किंवा KPIT मध्ये आढळू शकतो!

रोहीत मित्रा, सहीये! असाच दंगा करत रहा!!

बाकी काय? आपण सुज्ञ आहात असे गृहीत धरतो आणि आपली रजा घेतो! :-)

धन्यवाद!
निखिल मनोहर.

No comments: